पान:तुतीपासून रेशीम.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ बांधाव्या, व तशा दोन शिड्या समोरासमोर आंत सुपल्या सहज काढतां ठेवतां येतील इतक्या अंतरावर जमिनींत पुराव्यात. शिड्यांचे मागचे पुढचे पायरीवर एक एक याप्रमाणे एका चौखुरावर बारा सुपल्या राहू शकतील. ज्या मानानें आपणास सुपल्या ठेवावयाच्या असतील, त्या मानानें प्रत्येक बारा सुपल्यांस एक याप्रमाणें चौखूर तयार करावे. चौखुराची पहिली पायरी जमिनीपासून निदान एक फुटाचे उंचीवर बांधावी. उंदरास सुपलींत चढतां येऊ नये, ह्मणून जमिनी - पासून दहा इंचाचे उंचीवर एक फुटाचे व्यासाच्या पत्र्यांत बांबू बसवून नंतर पुरावा. रेशमाचे किडे उंदरांचें आव- डतें खाद्य आहे. तसेंच चौखुरावर मुंग्या चढू नयेत, ह्मणून चौखुराचे प्रत्येक पायास सदोदित ओलें राहील अशा रीतीनें वारंबार टार तेल लावावें. जोपर्यंत टार तेल ओलें असेल, तोंपर्यंत मुंग्यांस चौखुरावर चढतां येत नाहीं. एकदां टार तेल लावलें, ह्मणजे दोन चार दिवस पुन्हां लावावें लागत नाहीं. एरंडीचें तेल, अथवा करंजेल, अथवा दुसरें कोण- तेंही स्वस्तें चिकणें तेल फोडणीप्रमाणें लाल करून त्यांत ज्याप्रमाणें फोडणींत मोहऱ्या टाकतात, त्याप्रमाणें बिबे टाका- के, व ते सर्व फुटले ह्मणजे खाली काढून घेऊन तेल थंड होऊं द्यावें. नंतर त्यांतील चित्रे काढून घेऊन ते चांगले वांटून पुन्हां त्याच तेलांत मिसळावे. हें रोगण एकदां लावलें असतां जवळ जवळ वीस दिवस तरी निदान वाळत नाहीं. यास टार तेलापेक्षां खर्चही कमी येतो. वित्रे व तेल यांचे प्रमाण