पान:तुतीपासून रेशीम.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५ · असल्यास जाळीवर पाला घालून अर्धवट किडे वर आल्या- बरोबर जाळी उचलून दुसऱ्या रिकाम्या सुपलींत ठेवावी. ह्मणजे आपोआप सर्व किडे दोन सुपल्यांत एकसारखे केल्यासारखे होतील. अर्धे किडे काढून घेतल्यावर पहिल्या सुपलींत पाला घालावा, ह्मणजे एका ऐवजी दोन सुपल्या किड्यांनी व्यापल्या जातील. किड्यांखालची लीद व पाला किडे पाळावयाचे खो- लीत कधींही काढू नये. कारण लिदेची हवा किड्यांस अपाय- - कारक आहे. घरांतील हवा अतिशय थंड असूं नये. अति- शय थंडीचे दिवसांत किडे पाळावयाचें काम सुरू करूं नये. जाळ्यांचे साहाय्याने थंडीचे दिवसांपेक्षां अवांतर दिव- सांत किडे कांत केव्हां टाकतात, हें सहजासहजी समजतें. किडे दाट ठेवणें हें काटकसरीचें आहे खरें. पण त्यापासून निरोगी परिणाम होईल, असें मानणें व्यर्थ आहे. चौखूर. किड्यांच्या सुपल्या ठेवावयास चौखुर लागतात. सुपली आंत सहज राहू शकेल अशा अंतरावर चार बाजूंस चार बांबू रोवावेत. जमिनीत पुरल्या जाणान्या भागाशिवाय बांबूची उंची सात फुटाची असावी. एक फूट जागा सोडून समांतर अंतरावर एकावर एक अशा शिडीच्या पाय-यां- प्रमाणें बारा बारा काठ्या बांधाव्या. ह्मणजे दोन शिडया समोरासमोर तयार होतात. किंवा समांतर अंतरावर बांबूच्या जमिनीतील भागाशिवाय शिड्यांप्रमाणें आडव्या काठ्या ३