पान:तुतीपासून रेशीम.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ जाळून टाकतात. ही पद्धत कांहीं वाईट नाहीं. इकडल हवें वर्षांतून आठ वेळ किडे पाळतां येतात. सबब प्रत्येक वेळेस कातरलेल्या कागदांच्या जाळ्यांचा उपयोग केल्यास विनाकारण कागदांचा खर्च मात्र वाढेल. एकदां सुताच्या जाळ्या घेतल्यावर आठ दहा वर्षे तरी निदान पुन्हा जाळ्या घ्याव्या लागत नाहींत. युरोपांत सालांतून एकच वेळ किडे पाळावयाचे असतात.ह्मणून त्यांनी सुताच्या जाळ्यांचा उप- योग केल्यास त्यांचें नुकसान होतें. सुताच्या जाळ्या सुमारे आठ दहा वर्षे टिकतात. युरोपमध्ये त्यांनीं सुतांच्या जाळ्या वापरल्या, तर त्यांस वर्षांतून एक वेळ याप्रमाणें त्या जाळ्यांचा उपयोग आठ वर्षांत आठ वेळ होऊं शकेल. ह्मणजे जाळ्यांची किंमत आठ वेळच्या पिकावर बसेल. आपले इकडे सालांतून सहा ते आठ पिके घेतां येतात. याप्रमाणें आठ वर्षांचे पिकावर जाळ्यांची किंमत पडते. आठ वर्षांत त्यांना जाळ्यांचा उपयोग आठ वेळ होतो. व त्या आठ वर्षांनी जुन्या झाल्या कारणानें त्यांना दुसऱ्या जाळ्या घ्याव्या लागतात. ह्मणजे जेथें आपल्या जाळ्यांची किंमत पन्नास पिकांवर बसते, तेथें युरोपियन देशांत जाळ्यांची किंमत आठ पिकांवर द्यावी लागते. ह्मणून कागदांच्या जाळ्यांचा उपयोग त्यांना जास्ती होऊन आप- णास सुताच्याच जाळ्या फायदेशीर होतात. किडे पातळ करण्यासही जाळ्यांचा उपयोग होतो. मधील मधील किडे वेंचून ते विरळ करणें जिकिरीचें आहे. पण जाळचि योगानें हैं काम सहज होऊ शकतें. किडे विरळ करावयाचे