पान:तुतीपासून रेशीम.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३ जास्त उष्णता मिळून त्यांची वाढ झपाट्याने होते, क खालील किड्यांच्या बरोबरीनें ते वाढून सर्व किडे एका आकाराचे होतात. एकदां जाळीसकट किडे एका सुपलीवर काढल्यावर त्यांस तीन वेळ पाला घालावा, व चवथे वेळेस किड्यांवर जाळी पसरून पाला घालावा. व पुढील खेपेस जाळी उचलून दुसरे सुपलीत ठेवावी. खालील कचरा क जाळी खताचे खड्डड्यापाशीं नेऊन त्यांतील जाळी चांगली झाडून आणून दुसऱ्या वेळेकरितां जाळ्यांचे जागी ठेवावी.- याप्रमाणे एका सुपलीस नेहमीं दोन जाळ्या लागतात. जर आपणापाशीं पन्नास सुपल्या असतील, तर आपणाजवळ शंभर जाळ्या असल्या पाहिजेत. एखादा मेलेला किडा जाळीस लागला असेल, अथवा तो चिरडून त्याचा रस जाळीस लागला असेल, तर तेवढी जागा मोरचुदाचे पाण्यांत भिजवावी. किडे पाळण्याचे काम झाल्यावर सर्व जाळ्या मोर- चुदाचे पाण्यांत दोन मिनिटें ठेवून नंतर स्वच्छ पाण्यांत धुवून दुसरे वेळचे किडे पाळण्यास उपयोगांत आणाव्या. याप्रमाणे शुद्ध केल्याशिवाय किड्यांस लागणारी कोणतीही जिन्नस पुन्हा किडे पाळण्याकरितां उपयोगांत घेऊ नये. जाळ्या मोरचुदाच्या पाण्यांत भिजवून लागलीच धुवाव्यात. नाहीं तर क्षारानें त्यांचे तुकडे पडतात. युरोप वगैरे प्रदेशा- कडे जेथें सालांतून एकच वेळ किडे पाळतात, तेथें जाळ्यां- ऐवजी तिकडील लोक कातरलेल्या कागदाच्या जाळ्यांचा उपयोग करितात, व किडे पाळणें झाल्यावर त्या जाळ्या