पान:तुतीपासून रेशीम.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ चौखुरावर वरच्या जागी ठेवावी. हवेच्या मानाप्रमाणें किडे लवकर अथवा उशिरा पिकतात. उन्हाळ्याच्या दिवसांत थंडी- च्या दिवसांपेक्षां किडे लवकर पिकतात, व त्यांची वाढ झपा- व्यानें होते. आपणास किडे लवकर पिकावे अशी इच्छा असेल, तर वाजवीपेक्षां थोड्या अंशाने घरांतील उष्णता वाढवावी. जे किडे आधीं कांत टाकण्यास सुरवात करितात, ते मागाहून कांत टाकणाऱ्या किड्यांपेक्षां अगोदर पिकतात. किडे रोज थोडे थोडे पिकविण्यापेक्षां सर्व किडे एकदम तयार करावेत. नाहीं तर मागाहून पिकणाऱ्या किड्यांवर आपले विशेष लक्ष्य न राहतां त्यांस रोग होण्याची भीति असते. एकदम किडे पिकविण्यामध्ये दुसरा हा एक फायदा आहे कीं, सर्व किडे एकदम पिकल्यास किडे पाळावयाचें काम मागून रोज रोज करावें लागत नाहीं. तर एकदम सर्व काम एके वेळीं होऊन जातें. जे किडे अगोदर कात टाकण्यास सुरवात करितात, ते किडे अगोदर पिकतात. ह्मणून त्यांस चौखुरावर खालचे अंगास ठेवावें. व जे किडे मागून कांत टाकण्यास सुरवात करतात, ते मागून पिकतात. ह्मणून त्यांस चौखुरावर वरचे अंगास ठेवावें. ह्मणजे अगोदर पिकणान्या किड्यांपेक्षां मागून पिकणारे किडे वरचे बाजूस असल्या कार- णानें त्यांस अधिक उष्ण हवा मिळते. व त्यांची वाढ तळच्या किड्यांपेक्षां झपाठ्याने होऊन वरचे व खालचे किडे एकदम पिकूं लागतात. जसजसे वर जावें, तसतसें घरांतील वातावरण उष्ण असतें. खालच्यापेक्षां वरील किड्यांस याच कारणानें