पान:तुतीपासून रेशीम.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९ लांब रुंद असली ह्मणजे पुरे. लहान किड्यांपासून तों तहत पूर्णावस्थेस पावलेल्या किड्यांपावेतों एकाच आकाराच्या छिद्रांची जाळी चालते. जाळीचें छिद्र चवलीच्या आकारा- पेक्षां मोठें असूं नये. किड्यांवर पाला घातला, ह्मणजे किडे पाला खाण्याकरितां वर येऊन पाला खाऊं लागतात. प्रत्येक खेपेस जितका पाला घालावा, तितका सर्व पाला किडे खातात, असें नाहीं. किडे आपले मलविसर्जनही त्यांतच कर- तात. याप्रमाणें पुष्कळ वेळच्या पाल्याचा कचरा वलीद किड्यांखालीं राहिल्यास किड्यांची लीद व पाला उवतो. व असा कचरा सुपलीत बराच राहिल्यास त्यापासून किड्यांस रोगाचें फारच भय असतें. ह्मणून दोन चार वेळां किड्यांस पाला एकाच सुपलींत घातल्यावर त्यांतील किडे दुसन्या सुपलींत काढावेत, व पहिल्या सुपलींतील पाला व लोद किडे पाळण्याच्या घरापासून दूर खड्डयांत टाकावे. किड्यांची ली जनावरें फार आवडीने खातात. लिदीचें खत फार मौल्यवान आहे. पाले भाज्यांस याचा उपयोग केल्यास नेहमीपेक्षां दिढीनें चांगलें पीक घेतां येईल. ह्मणून लीद त्रिल- कुल वायां जाऊं देऊ नये. हें खत लागवडीस घातल्यानें पाला विपुल येतो, हें खरें. पण रोगट जंतूंचा पाल्याबरोबर किड्यांच्या घरांत जाण्याचा पुष्कळ संभव असतो. ह्मणून हे खत लागवडीस देऊ नये. लीद हमेषा खताच्या खड्ड्यांत ओली राहील, अशी व्यवस्था निदान सहा महिने तरी राखावी. नाहीं तर लीद वाळून तिचे कण हवेंत मिसळतात. व कदा-