पान:तुतीपासून रेशीम.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० चित् लिदेंत रोगट जंतु असल्यास ते हवेंत मिसळून जातील. व लागवडीतील पाल्यावर ते जंतु लागल्यास पाल्याबरोबर . किड्यांचे घरांत जातील. अशा पाल्यावर पाळलेल्या किड्यांत रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असतो. यास असें करावें कीं, लीद खड्डयांत टाकल्यावर रोज तिजवर घरांतील गुरांचें शेण टाकीत जावें. ह्मणजे ती लीद शेणाबरोबर ओली राहून शेण व लीद दोन्ही कुजून त्याचें मिश्र खत फार चांगलें होईल. लीद अतिशय उष्ण असते. ह्मणून ती कुजविल्या- शिवाय खताचे कामास घेऊ नये. नाहींतर फायद्या ऐवजी झाडें . जळून जातील. हा कचरा अशा ठिकाणी टाकावा कीं, त्या खताचे खड्ड्यावरून येणारा वारा किड्यांचे घरांत येऊ नये. दररोज हातानें किडे वेंचून एका सुपलींतून दुसरींत टाकणें हें अतिशय जिकिरीचें व निव्वळ अशक्य आहे. जाळ्यांच्या साहाय्याने शंभर सुपल्यांतील किडे दुसऱ्या सुप- ल्यांत काढण्यास कांहीं मेहनत लागत नाहीं. किड्यांखालचा कचरा दिवसांतून निदान एकदां तरी काढलाच पाहिजे. सुपलीतल्या किड्यांवर जाळी पसरून किड्यांच्या जाडी इतका पाला जाळीवर सारखा पसरावा, ह्मणजे दुसऱ्या खेपेच्या खाणें घालावयाच्या वेळेस सर्व किडे जाळीवरील पाल्यावर आलेले दिसतील. नंतर चारी बाजूनें जाळी ताणून उचलावी व दुसरे सुपलीत ठेवावी. ह्मणजे आपोआप सर्व किडे वेंचून दुसन्या सुपलींत टाकल्यासारखें होईल. जाळी काढल्यानंतर कचऱ्यांत किडे राहिले आहेत की काय, हें बारीक नजरेनें