पान:तुतीपासून रेशीम.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ उन्हांत वाळल्यानंतर तिचा उपयोग करावा, नाहीं तर उलट अपाय होईल. डांबर लावण्याच्या आधी सुपली वर सांगितल्या- प्रमाणे शेणाने सारवून नंतर तीस डांवर लावावें, हें चांगलें. कारण, त्या योगानें सुपली अधिक मजबूत होते. जरी डांबराचा अनुभव बऱ्याच मंडळींनी घेतला नाहीं, तरी कांहीं धंदेवाईक मनुष्ये त्याच्या विरुद्ध आहेत. पण ते कारण मात्र सांगू शकत नाहीत. डांबर लावलेली सुपली शुद्ध करा- वयाची असल्यास फक्त मोरचुताचे पाण्याने धुतली ह्मणजे झालें. तीस सारविण्याची जरूर नाहीं. डांबर लावलेल्या सुपल्या एकदां केल्यावर आठ नऊ वर्षे पुन्हा करण्याची जरूर नसते. ह्मणजे डांबर लावण्यानें दुहेरी फायदाच आहे. धंदा करणारास ज्या सुपल्या करावयाच्या असतील, त्या वर लिहिल्याप्रमाणे कराव्यात. पण मौजेखातर किडे पाळणारांनी वाटेल तशा आकाराच्या लहान सुपल्या केल्यास हरकत नाहीं. जाळ्या. किडे पाळावयाच्या अनेक उपकरणांपैकीं जाळ्या हैं मुख्य उपकरण आहे. मासे धरण्याकरितां ज्या प्रकारची जाळीं भोई तयार करतात, तसल्या जाळ्या किड्यांखालचा कचरा काढण्याच्या उपयोगास येतात. सुपल्या ज्या आकाराच्या असतील, तितक्याच आकाराच्या, पण किंचित् मोठ्या जाळ्या असाव्यात. ह्मणजे त्या जाळ्यांनीं सुपल्या झांकल्या जाव्या. सुपलीच्या आकारापेक्षां चोहों बाजूंनी चार पांच वोटें जाळी