पान:तुतीपासून रेशीम.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७ ह्मणजे त्या मेलेल्या किड्यापासून उत्पन्न झालेल्या रोगट जंतूंचा नायनाट होईल. एखादा किडा सुपलीत मरून तीतच कुजला जाईल, अथवा एखादा किडा चिरडला जाऊन त्याचा लेह तींत कुजला जाईल व त्यावर बुरसा चढेल, तर थोडेना थोडे तरी रोगट जंतु तयार होतीलच. जाळी काढ- ल्यावर खालील मुलींत मेलेला किडा आढळल्यास, अथवा पाला घालावयाचे वेळेस एखादा मेलेला किडा नजरेस आ- ल्यास वर सांगितल्याप्रमार्णे व्यवस्था करावी. किडे कितीही चांगल्या रीतीनें पाळले, तरी लाखों किड्यांत एकही किडा मरणार नाही, अशी बढाई मारणें व्यर्थ आहे. कांहीं किडे दावाने मरतात, तर कांहीं किडे सुपलीच्या सडाने भोक पडून मरतात; ह्मणजे लाखो किडे पाळीत असतांना थोडेसे किडे रोगाशिवाय इतर तऱ्हेनें मरतातच. सुपलींत मेलेला किडा आढळल्यास ताबडतोब काढून वर सांगितल्याप्रमाणे व्यवस्था करावी, नाहीं तर रोगास बोलावल्याप्रमाणे होईल. किडे पाळावयाचे झाल्यावर प्रत्येक वेळीं सुपल्या सारवण्यास बरीच मेहनत लागते. तसेंच कांहीं महिने लोटल्यावर त्यांस कीड लागून त्यांतून बारीक भुकणी बाहेर पडूं लागते, व त्या योगानें दोन सालांतच सुपल्या निरुपयोगी होतात. ह्मणून त्यांस माझ्या मतें डांबर लावल्यास बरें. डांबर लावलेल्या सुपलीत मी पांच सहा पिके चांगल्या तऱ्हेनें काढलीं, व त्यावरून डांबरा- पासून किड्यांस कांहीं एक अपाय होत नाहीं, असें माझ्या अनुभवास आले आहे. डांबर सुपलीस लावून ती चांगली ·