पान:तुतीपासून रेशीम.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ एक सुपली, याप्रमाणें १२० शेर कोसले तयार करणारे किडे ठेवण्यास ६० सुपल्या लागतात. १२० शेर कोसले तयार करणारे किडे अंड्यांतून फुटल्यावर त्यांस ठेवण्यास प्रथम पाऊण सुपली व्यापिली जाते, व जसजसे किडे मोठे होत जातील, तसतसें त्यांस विरळ करतां करतां त्यांच्या पूर्णा- 'वस्थेच्या वेळीं ते आपल्या आकाराच्या ऐशी पट वाढल्या कार- णानें साठ सुपल्यांची जागा व्यापितात. किडे अंड्यांतून फुट- ल्यापासून पिकूं लागे पावेतों ते आपल्या अंगावरची कात चार वेळ टाकतात, व प्रत्येक कात टाकल्यावर त्यांचा आकार पहि- ल्यापेक्षां तिपटीने वाढत जातो. ह्मणजे प्रत्येक कात टाकल्या- नंतर ते पहिल्यापेक्षां तिपटीने अधिक जागा व्यापतात. प्रत्येक सुपली घट्ट करून घेण्याची सावधगिरी ठेवावी. सुपल्या आणल्याबरोबर त्या शेणाने सारवाव्या, ह्मणजे त्या पहिल्यापेक्षा जास्त घट्ट होतील. किडे पाळावयाचें काम झाल्या- वर प्रत्येक वेळी झालेल्या रोगजंतूंचा नाश करण्यासाठी एक भाग मोरचूत व शंभर भाग पाणी असें मिश्रण करावें, व शेणा- मध्ये या मिश्रणाचें पाणी घालून सुपल्या सारवाव्यात. व त्या वाळल्यानंतर घरास गंधकाची धुरी देतांना त्या आंत ठेवून धुरी द्यावी. रेशमाचा किडा नाजूक आहे. एखादा किडा सुपलींत मेलेला आढळल्यास बाकीचे किडे ताबडतोब दुसऱ्या सुपलींत बदलावे, व ज्या जागी किडा मेलेला आढळला असेल, त्या जागीं ताबडतोब थोडी मोरचुदाची पूड चोळावी, आणि त्यावर चुन्याची भुकणी छाटावी.