पान:तुतीपासून रेशीम.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ एवढें मात्र करावें कीं, ज्या त्या घराचें सामान मात्र त्याबरोबर हलवीत जाऊं नये. सुपल्या. किडे पाळण्यास ज्या सुपल्या तयार करतात, त्या कित्येक चौकोनी व कित्येक गोल अशा प्रकारच्या आकारा- च्या असतात. लहान सुपल्या करण्यापासून त्या काढण्याची व ठेवण्याची उठबस विनाकारण अधिक वेळ करावी लागते. सुपल्यांची कड एक इंच किंवा दीड इंच यापेक्षां जास्त अस- ण्याची जरूरी नाहीं. पाळीव रेशमी किडयांची जात इतकी ऐदी झालेली असते कीं, बसल्या जाग्यावरून एक इंच देखील ते खाण्याच्या वेळेशिवाय इकडे तिकडे हालत नाहींत. चौकोनी सुपली असल्यास ती सवातीन फुट रुंद व साडेचार फूट लांबीची करावी, व गोल सुपली असल्यास तिचा व्यास ५ ते ५॥ फुटाचा असावा. आपल्यास हमेषा किती पाला मिळू शकेल, व त्यावर दर पिकास किती कोसले तयार करणारे किडे पाळतां येतील, याचा पहिल्यानें अंदाज करून नंतर त्यास लागतील इतक्या सुपल्या पहिल्यानें तयार ठेवल्या पाहिजेत. दर वेळेस आपणास ६० मण पाला खात्रीने मिळू शकेल, असा अंदाज असल्यास १२० शेर ह्मणजे ३ मण कोसले तयार करतील, इतके किडे पाळाव- यास लागणाऱ्या सुपल्या तयार ठेवल्या पाहिजेत. असे को- सले तयार करणारे पूर्ण वाढलेले किडे ठेवण्यास दोन शे