पान:तुतीपासून रेशीम.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ असें घेऊन चालं की, आपल्यापाशीं हजारों खंडी तुतीचा पाला 9 आहे, व त्यावर आपणास किडे पाळावयाचे आहेत. अशा वेळी निरनिराळीं घरे बांधून त्यांतून पिकें घेत जावीत. ह्मणजे त्यांत किडे पाळीत जावेत. पहिल्या प्रथम ज्या वेळेस किडे फुटतात, त्या वेळीं ते आपल्या पूर्ण वाढीचे ऐशी पट लहान असतात. व दर दोन तीन दिवसां- आड ते आपल्या आकाराच्या दुपटीने वाढत जात असतात. व जसजसे ते किडे वाढत जातात, तसतसें त्यांना विरळ करावे लागल्याने पहिल्यापेक्षां जास्त सुपल्या लागतात, व त्या मानाने त्यांना घराची जागाही मोठ्या प्रमाणांत लागत जाते. किड्यांना वारंवार निरनिराळ्या जागेत बदलण्यानें किड्यांस रोगापासून बरेंच अलिप्त ठेवतां येतें. ह्मणून निर- निराळी घरे बांधून प्रत्येक कांत टाकण्याचे वेळेस किडे निर- निराळ्या घरांतून बदलीत गेल्यास त्याचा त्यांच्यावर फार उत्तम परिणाम झालेला नजरेस येईल. बंगाल प्रांतांत बीज विक- णाऱ्या संस्थांमध्ये किडे पाळण्याकरतां निरनिराळीं लहान घरें बांधलेली असतात. मोठ्या प्रमाणांत जेथे किडे पाळावयाचे असतील, तेथेंही निरनिराळी घरे बांधून त्यांचा उपयोग करावा. ज्यांना मोठ्या प्रमाणावर कारखाना करावयाचा असेल, त्यांनी सर्व घरें एकसारखी मोठमोठीं न बांधतां एकापेक्षां एक मोठें याप्रमाणें निरनिराळ्या आकाराची घरे बांधावीत व ज्या- प्रमाणें किड्यांना मोठमोठी जागा लागत जाईल, तसतसें त्यांना निरनिराळ्या घरांतून बदलीत जावें. पण त्याबरोबर