पान:तुतीपासून रेशीम.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३ वर हवा कितीही उष्ण असली तरी जमिनीतील घरांतील हवेवर बाहेरील हवेचा विशेष परिणाम होत नाहीं. असच घर असल्याशिवाय किडे पाळतां येत नाहींत, असें मात्र नाहीं. असें वर प्रथमारंभी बांधण्याची जर कोणास ऐपत नसेल, तर साधारण निजावयाच्या खोलींत किडे पाळीत गेलें तरी चालेल. पण तेथेंही वर सांगितल्याप्रमाणें सर्व सोई करून घ्याव्यात. ह्मणजे किडे पाळण्याच्या खोलीत माझ्या न येण्याची व्यवस्था करण्यास, हवेचा अवरोध करण्यास, व हवा आंत घेण्यास साधनें असावीत. घरांत किडे पाळीत असतां हवा घाण असूं नये. ह्मणजे खोलींत घाण न येईल, अशा- विषयीं नेहमीं दक्षता ठेवावी. मोठ्या प्रमाणांत जेथें किडे पाळावयाचे असतील, येथें निरनिराळ्या ठिकाणीं लहान लहान घरे बांधावीत. व त्यांपैकीं एक घर मोठें असावें. ज्या वेळीं किडे अंड्यांतून बाहेर येतात, त्या वेळी त्यांना थोडी जागा पुरते, व जसजसे ते मोठे होत जातात, तसतशी त्यांना जास्त जागा लागत जाते. ह्मणून पहिल्यानें लहान घरांत, नंतर त्यापेक्षां मोठ्या घरांत, याप्रमाणें किड्यांस ठेवीत जावें. एक जागा सोडून दुसऱ्या घरांत किडे नेल्यावर ह्मणजे एका घरांतून किडे हलविल्याबरोबर ती जागा, अथवा तें घर लागलेच मोर- चुताचे पाण्याने सारवावें व त्या घरांतील सर्व सामान तसल्या - च पाण्याचे मिश्रणाने धुवून त्यास गंधकाची धुरी देऊन शुद्ध करून बंद करून ठेवावें. व पुन्हा किडे पाळण्याच्या कामा- शिवाय त्याचा उपयोग करीत जाऊं नये. उदाहरणार्थ, आपण २