पान:तुतीपासून रेशीम.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ त्यांतल्या त्यांत १४ फुट उंचीच्या असल्यास उत्तम. घरा- च्या भिंती उंच असल्यास घरांत समशीतोष्ण हवा राख- ण्यास बरीच मदत होईल. तसेंच भिंती जाड असल्यास बऱ्या. घराचें छपर गवताचेंच करावें. मधील माझ्या मार- ण्याचें घर दुमजली करावें. व खालच्या मजल्याची उंची ६ फुटांपेक्षां जास्ती असूं नये. कारण त्यांत माझ्या आल्यावर केरसुणीनें झटकून मारतां याव्यात. माझ्या मारण्याच्या खोलीच्या वरच्या मजल्याचा कोसले तयार झाल्यावर ते ठेव- प्याला उपयोग होतो. माझ्या मारावयाच्या खोलीचा उपयोग पाला सांठवून ठेवण्याच्या कामाकडे होतो. किडे पाळण्याच्या खोल्यांचीं छपरे गवताचींच करावीत, म्हणजे त्यापासून उष्णतेच्या दिवसांत थंड व थंडीच्या दिवसांत उष्ण हवा राखण्यास नैसर्गिक मदत होते. किड्यांचे घरांत जावयाचें म्हटलें ह्मणजे अगोदर माझ्या मारण्याच्या खोलींत चटदिशीं जाऊन त्या खोलीचें दार बंद करून घ्यावें. व खोलींत गेल्यावर आपल्या बरोबर खोलींत कांहीं माझ्या आल्या आहेत की काय, हें पहावें. आल्या असल्यास त्या केरसुणीनें मारून आतां माशी नाहीं, अशी खात्री झाल्यावर किड्यांच्या खोलीचें दार उघडावें. सारांश, कोणचेही रीतीनें कि- ड्यांचे खोलींत माशा जाऊं देऊ नयेत. अतिशय उष्ण- तेचा प्रदेश असल्यास तेथें जरी व्यापारी दृष्टीने पाहतां किडे पाळणें कठिण जातें, तरी अशा प्रदेशांत देखील किडे पाळा- वयाचे असल्यास घरे जमिनींत करावें, व त्यांत किडे पाळावे.