पान:तुतीपासून रेशीम.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५९ तारडोळ्यांच्या चाकावरून तार घेण्याचें कारण हें आहे कीं, ती तार एकसारखी एकजीव होण्याकरतां तारेवर तार आपल्याच अंगाशीं चक्राकार घासली जाऊन नंतर रहाटा- वर गुंडाळली जावी. शेवटीं चित्रांत दाखविल्याप्रमाणें तारठोकळ्यावरून तार रहाटावर घ्यावी, व नंतर रहाट फिरवूं लागावें. ह्मणजे कोसलेरूपी गुंड्या भराभर उल- गडल्या जाऊन एकसारखी सलंग तार निघू लागते. या- प्रमाणें कोसले उलगडले जात असतां त्या उलगडल्या जाणाऱ्या कोसल्यांपैकीं एखाद्या कोसल्यांतील तार संपली किंवा तुटली, असें दिसून आलें, तर डावे हातांतून कोस- ल्यांच्या तारांच्या लडींतून दोन तारा घेऊन शेवटीं चित्रांत दाखविल्याप्रमाणें त्यांची शेवटें तर्जनीनें त्या उलगडल्या जाणान्या तारांवर मारावीं. ह्मणजे त्यांत त्या गुंतल्या जाऊन त्या दोनही कोसल्यांच्या तारा त्या तारांत मिसळून, ह्मणजे त्या एकवट रूपाच्या तारांत मिसळल्या जाऊन, त्यांची एक तार होऊन रहाटावर गुंडाळली जाते. या वेळीं .पाहूं लागलें, तर सात कोसले, ह्मणजे पहिले पांच व दुसरे दोन, मिळून एकंदर सात कोसल्यांच्या तारा एकसारख्या उलगडल्या जात आहेत, असें दिसून येईल. आपण पहि- ल्याने सहा तारांची एक तार याप्रमाणें रेशीम उकलाव- यास सुरू केलेलें असतें. तेव्हां निघणाऱ्या रेशमाच्या तारेची जाडी एकसारखी कायम रहावी, ह्मणून जे सात कोसले उलगडले जात असतात, त्यांतील एक तार तोडून काढून