पान:तुतीपासून रेशीम.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५८ लड तोडून काढावी, व त्या धरलेल्या तारा डावे हातांत धरून रेशमाच्या सलंग तारा काढण्यास सुरू करावें. इतकें सर्व कृत्य होई पावेतों कढईतील पाणी अध- णाच्या उष्णतेचें असावें. नंतर त्या पाण्याची उष्णता कमी करावी. असें करण्यास भट्टींतील कढईतील पाण्यांत थोडें थंड पाणी मिसळावें. आणि भट्टींतील जळणारी लांकडेंही थोडीं कमी करावी. वर निर्दिष्ट केलेलें कार्य होण्यास कोसले कढईंतील पाण्यांत टाकल्यापासून अजमासें दहा मिनिटें पुरी होतात. अगदीं नवीन माणूस असला, तरीही त्यास दहा बारा मिनिटें पुरेशीं होतात. रेशमाच्या कोसल्यांच्या तारा सुदूं लागल्या, ह्मणजे लागलीच कढईंत डावे हातानें थंड पाणी ओतून पाण्याची उष्णता कमी करावी. अधिक वेळ कोसले अधणाच्या पाण्यांत ठेवल्याने त्यांच्या तारांची बळकटी कमी होते. ह्मणून तारा सुदूं लागल्यापासून त्या सर्व कोसल्यांचें रेशीम निघेपर्यंत कढईतील पाणी बेता- चेंच उष्ण ठेवावें. सुटू लागलेल्या कोसल्यांच्या तारांची लड डावे हा धरून उजवे हातानें त्यांतील सहा तारा तोडून घेऊन त्या एका जागीं करून तारडोळ्यांतून ओवून घ्याव्या, व ती एकवट झालेली सार शेवटीं चित्रांत दाखविल्याप्रमाणे. तारठोकळ्याच्या निरनिराळ्या चाकांवरून घेऊन नंतर ती रहाटास जोडावी.