पान:तुतीपासून रेशीम.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६० घ्यावी, व सारखे सहाच कोसले उलगडत रहातील, अशी व्यवस्था ठेवावी. ज्या वेळीं रेशीम उलगडलें जात असतें, ह्मणजे ज्या वेळीं कोसले उलगडले जाऊन एकवट तारेच्या रूपानें तार रहाटावर एकसारखी गुंडाळली जात असते, त्या वेळीं तारडोळ्यापासून कढईतील पाण्यापर्यंत त्या निरनिराळ्या कोसल्यांच्या तारा व कोसले हुबेहुब टिपऱ्या खेळून गोफ विणतांना मुळे दिसतात, तद्वत् दिसत असतात; ह्मणजे त्यांतील गोफ विणल्या जाणाऱ्या दोऱ्या ते कोसल्यांचे उकलले जाणारे तंतु, व मुलें हे कोसले, असें दृष्टोत्पत्तीस येतें. आपण असें वेऊन चालूं कीं, सहा मुलें घराचे कडी- पाटास दोऱ्या बांधून टिपऱ्या खेळून गोफ विणत आहेत; अशा समयीं एखाद्यानें येऊन त्या विणल्या जाणाऱ्या दोन्यां- वर चाबकाने फटकारा मारला, तर चाबकाची दोरी त्या जोराने त्या गोफाच्या दोऱ्यांत अडवी तिडवी गुंडाळत जाईल, व त्या दोऱ्यांत अडकून बसेल. तद्वतच उलगडल्या जा- णान्या कोसल्यांपैकीं एखादा कोसला कमी झाला असेल, तर त्या उलगडल्या जाणाऱ्या तंतूंवर तंतु मारून दुसऱ्या कोसल्याच्या तंतूची भर द्यावयाची असते. याप्रमाणें संप- लेल्या कोसल्यांच्या ऐवजीं भर देत देत सर्व कोसल्यांच्या तारा काढणें झाल्यावर फिरून कोसले घेऊन पूर्ववत् क्रिया करावी.