पान:तुतीपासून रेशीम.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५७ गुंतीची लडच पाण्यांत बुचकळीत आहों, ह्मणजे फक्त लडीसच आपण डुबक्या देत आहों, असें आढळून येतें. असें दिसून आलें, ह्मणजे आपण आपला हात थांब - वाचा व ती हातभर उंचीची लड डाव्या हातांत घेऊन उजवे हातानें हातापासून पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत चांगली निपटावी. निपटण्याचा वेळेस त्यावर थोडे थंड पाणी ओतावें. लडीवर थंड पाणी ओतण्याचें कारण हें आहे कीं, त्या लडीला आपण कढईतील पाण्यांत नुकतीच डुबकी दिलेली असल्यानें निपटतांना हात भाजतो. तो भाजूं नये, ह्मणून त्यावर थोडे थंड पाणी टाकावें, असें आह्मी ह्यटलें आहे. कित्येक सरावलेलीं मनुष्यें लडीवर थंड पाणी न टाकतां तसेच लडीवर झपाट्यानें हात फिरवून लड निपटून घेतात. पण हें सरावाचें काम आहे. याप्रमाणें लड निपटल्यावर पाण्याच्या पृष्ठभागापाशी पाण्यावर तरंगणाऱ्या कोसल्यांचीं शेवटें धरून वर उचलून पुन्हा पूर्ववत् डुबक्या द्याव्यात. वर सांगितल्याप्रमाणें सर्व क्रिया "पूर्ववत् कराव्या. याप्रमाणे सहा सात वेळ केल्यावर शेवटीं असें आढळून येईल कीं, उचली उचली पावेतों को ले तंतु सोडूं लागतात, ह्मणजे कोसल्यांपासून सहज तंतु निघूं लागतात. सर्व कोसल्यांच्या तारा निघू लागल्यावर, ह्मणजे सर्व कोसल्यांतून तारा सुटू लागल्यावर, त्या सर्व तारा पाण्याच्या पृष्ठभागापाशीं धरून वरील गुंतागुंतीची १४