पान:तुतीपासून रेशीम.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५६ उलगडले जातील. अशीच स्थिति रेशमाचे कोसले उक- लतानां असते. गुंड्या पाण्यांत शिजत असतांना त्यांस जुडीने चोचविल्यास गुंड्यांचीं वरील आवरणें सैल होऊन ती गुड्यांवरून निसटतात. व याप्रमाणें थोडा वेळ अधिक चोचविल्यास तीं निरनिराळ्या सुटलेल्या गुंड्यांची आवरणें एकमेकांत गुरफटून त्यांचा गुंताळा होतो. व असा गुंताळा झाल्याने सर्व गुंड्या एकमेकांस जोडल्या जातात. असला गुंताळा, अथवा दोन्यांच्या गुंतागुतीची लड, हातांत धरून वर उचलल्यास त्या गुंड्यांची शेवढे हातांत घेतल्या- प्रमाणें होतें. याप्रमाणें रेशमाच्या कोसल्यांची शेवटें हातांत घ्यावयाचीं असतात. अशीं शेवटें हातांत धरून कढईपासून वर उचलल्यास तीं पोफळाचे झापे हातांत धरल्याप्रमाणें दिसूं लागतील. ह्मणजे, त्यांतील पोफळे हे कोसले, पोफ- ळाचे देठ हे तंतु, व त्या सर्व झाप्यांचा हातांत धरलेला देठ ही कोसल्यांचे वरील आवरणांची गुंतागुतीची लड; याप्रमाणें त्यांत बरेच साम्य दिसतें. सर्व कोसल्यांच्या तंतूंची गुंतागुंतीची लड हातांत घेन- ल्यावर तो हात त्या लडीसकट हातभर उंच उचलून पुन्हां खाली करावा. याप्रमाणे वारंवार केल्यानें त्या अग्रांच्या लडी- सकट कोसल्यांस कढईतील पाण्यांत डुबक्या दिल्याप्रमाणें होईल. या प्रत्येक डुबकीस कोसल्यांचे तंतु हलके हलके उलगडले जातात. व ते कोसले खालीं सरकतां सरकतां सर्व कोसले पाण्यावरच राहूं लागतात. व फक्त ती गुंता-