पान:तुतीपासून रेशीम.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५५ वर निर्दिष्ट केल्याप्रमाणें आपण असें घेऊन चालूं कीं, आपणास डिंकाच्या पाण्यांत भिजवलेल्या दोन्यांच्या गुंड्या उकलून त्यांच्या लड्या बनविणें आहेत. परंतु एकेका गुंडीचा एक एकच दोरा उकळून त्यांच्या लड्या बनवाव याच्या नसून तसल्या सहा सात गुंड्यांचे दोरे एका ठिकाणीं घेऊन सर्व गुंड्यांचे दोरे उकलावयाचे आहेत. असें करण्याकरितां त्या गुंड्या कढईमध्ये घालून शिज- विल्या पाहिजेत. जर त्या थंड पाण्यांतच भिजत ठेविल्या, तर त्या आंतून बाहेरून सर्व सारख्या भिजणार नाहींत, व दुसरे असें कीं, त्यांतील डिंकाचा चिकटपणा त्यांतच राहील. फार तर गुंड्यांच्या वरील आवरणाचा चिकटपणा त्या पाण्यांत. मिसळल्या कारणानें तो थोडा कमी झालेला आढळेल. पण जर त्या गुंड्या शिजविल्या, तर थोड्या वेळाचे आंतच त्या आंतून व बाहेरून सर्व सारख्या भिजतील, व त्यांतील डिंक सर्व पाण्यांत सारखा मिसळल्याने गुंड्यांचा चिकटपणा बऱ्याच प्रमाणांत कमी होईल. याप्रमाणे गुंडाळ्यांतील चिकटपणा नाहींसा झाल्यानें गुंड्यांतील दोरे बन्याच प्रमा- गांत गुंड्यांतले गुंड्यांतच सुटे होऊन त्यांची वेष्टनें झपा- ट्यानें उलगडलीं जातील. साधी दोऱ्याची गुंडी घेऊन, त्यांतील दोऱ्यांचें शेवट हातांत धरून जमिनीवर टाकून दोरा उलगडीत गेल्यास ज्याप्रमाणें गुंडीतील दोरा झपायानें उलगडला जातो, तद्वतच त्यांचीही शेवटे धरून उल- गडूं लागल्यास त्यांचीही वेष्टनें, ह्मणजे दोरे, झपाट्यानें