पान:तुतीपासून रेशीम.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ तल्या घरांत उत्पन्न झालेले जर कांहीं किड्यांच्या रोगाचे जंतु असतील, तर ते पार मरून जातील; इतकेंच नव्हे, तर हर- एक तऱ्हेनें आंतील जागा शुद्ध होईल. खोलीची लांबी रुंदी १५x१२ फुटाची तरी निदान असावी, व तिचें दार इतकें मोठें असावें कीं, किडे पाळावयाच्या सुपल्या आंतून बाहेर सहज नेतां याव्यात. एकादे इसमास सशास्त्र रीतीने किडे पाळण्याकरितां घरे बांधावयाची असल्यास, त्याची माहिती येणेंप्रमाणे : पहिल्यानें वर बांधावयास जी जागा पहा- वयाची, ती झाडाखाली असल्यास उत्तम. झाडाखालील घरांत हवेमधील फरकाचा परिणाम ताबडतोब होत नाहीं. त्यांतून घरानजीक तलाव, नदी, अथवा झऱ्याजवळील जागा असून झाडाखाली असल्यास विशेष चांगलें. घरें जीं बांधावयाचीं तीं मोठ्या प्रमाणावर बांधावयाची रीत निराळी व धाकट्या प्रमाणावर बांधावयाची रीत निराळी. बांधणुकीचा मतलब एकच, पण त्यांतल्या त्यांत काटकसर पहावयाची असते. प्रत्येक धंद्याचे काटकसर हैं आदितत्त्व होय. साधारण शेतकरी एका एकराच्या लागवडीवर जर धंदा करूं इच्छित असेल, तर त्यानें नंबर १ प्रमाणें घर बांधावें, व मोठ्या प्रमाणावर धंदा करणारास बांधावी लागणारी घरे त्याने नंबर २ प्रमाणें बांधावीत. घराच्या भिंती बांधावयाच्या त्या नुसत्या मातीच्या बांधल्या तरी चालतील. पण मवलें माशा मारण्याचें घर पक्के बांधावें. किडे पाळावयाच्या खोलीच्या भिंती १२ फुट उंचीच्या तरी निदान असाव्या.