पान:तुतीपासून रेशीम.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५४ कढईतील बहुतेक कोसले जुडीला लटकल्यावर ती जुडी पाण्यावर फेसाळावी. फेसाळल्याने कोसल्यांतील आव- रणाचे तंतु अधिक उलगडले जातात, व जुडीला लगटून असलेले कोसले जुडीपासून वीत दीड बीत अलग होतात. तरी देखील ते आपल्या गुंतागुंतीच्या तंतूनें जुडीला जोड- लेलेच असतात. ह्मणजे वीत दीड वीत लांबीच्या तंतूनें कोसले जुडीला जोडलेले असतात. याप्रमाणें जुडीला कोसले लोंबकळू लागल्यावर, कोसल्यांच्या तंतूंची गुंतागुंतीची लड जुडीपासून सोडवून डावे हातांत धरावी. जुडीपासून लड सोडवितांना तंतु तुटतील वगैरे गोष्टीं- कडे लक्ष देण्याचें कांहीं कारण नाहीं. कारण, कोसल्यांच्या एकांत एक गुंतलेल्या तारांची लड ह्मणजे कमी अधिक प्रमाणाच्या लांबीच्या रेशमाच्या तंतूंची गुंतागुंतीचीच ती लड असल्यानें ती जुडीपासून सोडवून काढतांना, जे ओढून काढतांना, जरी त्यांत ताटातूट झाली, तरी कांहीं हरकत नसते. लड डावे हातांत धरून झाल्यावर कढईतील पाण्यांत कांहीं कोसले स्वैरपणानें तरंगतांना आढळून आल्यास जुडीनें चोचवून चोचवून त्यांचीही शेवटें गुंतागुंतीच्या तंतूंच्या हातांत येतील, अशा रीतीनें पूर्ववत् क्रिया करावी. सर्व कोसल्यांचीं अप्रें आपल्या हातांत आल्यावर, ते लगामरूपी कोसल्यांचे तंतु डावे हातांतून उजव्या हातांत घ्यावेत.