पान:तुतीपासून रेशीम.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५३ मागें लिहिल्याप्रमाणें सर्व साहित्य तयार करून ठेवून कोसल्यांपासून रेशीम उलकण्यास सुरवात करावी. पहि- त्याने भट्टी पेटवून भट्टीवरील कढईतील पाण्यास आण येऊं द्यावें. नंतर वाफवून तयार केलेल्या कोसल्यांपैक अजमासें तीनशें कोसले कढईत टाकावेत. व ते तसेच पांच सात मिनिटें पाण्यांत उकळू द्यावे. कोसले वाफवल्याशिवाय मात्र उकलण्याकरतां घेऊं नयेत. नाहीं तर तंतु झपाट्याने उलगडले जात नाहींत. कोसले बाफविल्यानें कोसल्यांत वाफ मुरते. व ती वाफ कोसल्यांतून फिरून बाहेर पडतांना कोसल्यांतील चिकट- पणाचा अंशही बन्याच प्रमाणानें ती कमी करते. दुसरें, वाफेच्या उष्णतेनें कोसले फुलतात. अशा फुललेल्या कोस- ल्यांचे तंतु झपाट्यानें उलगडले जातात. भट्टींतील कढईतील पाण्यांत कोसले पांच सात मिनिटें उकळल्यावर वसि पंचवीस काड्यांच्या केलेल्या जुडीनें पाण्यांतल्या पाण्यांत चोचवावेत. भेंडें किंवा बुचें पाण्यांत टाकली असतां जशी तरंगत असतात, तद्वतच कोसलेही तरंगत असतात. अशा तरंगणाऱ्या कोसल्यांस काड्यांच्या जुडीने चोचविल्यास कोसल्यांच्या तंतूंचीं वरील आवरणें कोसल्यांवरून निसटतात. व त्या आवरणांतील तंतु त्या जुडीच्या काड्यांत गुरफटून बहुतेक सर्व कोसले जुडीला जोडले जातात.