पान:तुतीपासून रेशीम.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ तांना तो दोरा डिंकानें चांगला भिजवून त्याची घट्ट गुंडी करून नंतर ती गुंडी वाळविली असतां ज्याप्रमाणें दोरा एकसारखा आपल्याच दुसऱ्या भागाशीं चिकटत गेलेला असेल, तसलीच स्थिति रेशमाचे कोसल्यांची असते. सात ते पंधरा कोसल्यांच्या तंतूंच्या एका जागी केलेल्या लांबच लांब तारांच्या लड्या आपणांस बाजारांत कच्चें रेशीम या नांवानें मिळतात, व यापासूनच पुढें रंग देऊन नाना जातीचे रेशमाचे कपडे बनविलेले असतात. कोसल्यांपासून आपणांस अवश्यक असलेल्या जाडीची अखंड तार काढणें, यालाच रेशीम उकलणें असें ह्मणतात. कच्या रेशमाची किंमत कमी अधिक मिळणें हें रेशमाच्या लड्यांच्या तारेवर अवलंबून असतें. तार ज्या मानानें एक- सारख्या जाडीची असेल, व ती ज्या मानानें साफ व एकसारखी अखंड असेल, त्या मानानें रेशमाची कमी अधिक किंमत गणली जाते. तार एकसारख्या जाडीची होण्यास ठरीव संख्येच्या कोसल्यांच्या तंतूंची तार उकलीत गेलें पाहिजे. आपण जर पहिल्यानें सात कोसल्यांच्या तंतूंची एक तार याप्रमाणें उकलण्यास सुरू केलें असेल, तर अखेर पावेतों तारेची जाडी सहा, सात व आठ यापेक्षां कधींही कमी किंवा अधिक होऊं देऊं नये. दहा तंतूंची तार धरलेली असल्यास अखेर पावेतों तारेची जाडी नऊ, दहा व अकरा, यांचे दरम्यान असावी.