पान:तुतीपासून रेशीम.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५१ कोसल्यांचे तंतु काढणें, अथवा कोसले उकलणें. कोसला ह्मणजे रेशमाचे अखंड तंतूंची गुंडी बाजारांत आपणांस दोन्याच्या गुंड्या मिळतात, त्यांचें आणि कोस- ल्यांचें बरेंच साम्य आहे. फरक इतकाच कीं, गुंडी भरीव असते, व रेशमाचा कोसला पोकळ असतो. कित्येक वेळा गुंड्या देखील मध्यभागीं पोकळ असतात. गुड्यांचा मधला भाग आरपार पोकळ असतो, पण कोसल्यांच्या सर्व बाजूनें अखंड तंतूंचें वेष्टन असतें. गुंडीचा दोरा जाड असतो, पण कोसल्यांचा तंतु अति बारीक असतो; इतका कीं, शंभर नंबरी दोऱ्या इतक्या जाडीची तार तयार करण्यास रेश- माचे पन्नास तंतु एका जागी केले पाहिजेत. दोऱ्याचे गुंडीतील दोरा एकावर एक गुंडाळला जात असतांना तो आपल्या दुसऱ्या भागाशीं चिकटत नाहीं. पण रेशमाचे गुंडचें तसें नसतें. किडे कोसला तयार करतांना आपले 'तोंडांतून तंतु काढून त्याची गुंडाळी बनवीत असतात. अशां वेळीं किडे तो तंतु जसजसे गुंडाळीत जातात, तसतसा तो नुकताच त्यांचे तोंडांतून निघत असल्याने अगदी ओला असतो. ह्मणजे तो तंतु किड्यांचे तोंडांतील चिकट लाळेनें लडबडलेला असतो, व या योगानें तो तंतु गुंडाळत जात अस- तांना आपल्या दुसऱ्या भागाशीं चिकटलेला असल्यानें त्याचे थर एकमेकांस चिकटलेले असतात. दोन्याची गुडी कर-