पान:तुतीपासून रेशीम.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५० व्यांचा उपयोग करावा लागतो. ह्मणून प्रत्येक रेशीम उक- लणाराने एक पसरट वाटी आपल्या जवळ घेत जावी. कोसल्यांचें कच्चें रेशीम उकलण्याकरतां कोसले कढई- तलि आधणाच्या पाण्यांत शिजूं घातल्यावर त्यांतील वरच्या सलंग तारेच्या आवरणाचीं शेवटें हातांत येण्या- करतां त्यांस वीस पंचवीस काड्यांच्या जुडीने चोचवावें लागतें. या कामाकरतां काड्यांच्या जुड्या कसल्याही असल्या तरी चालतात. हिराच्या किंवा आगकाड्यांच्या जाडीच्या बांबूच्या वीत वीत लांबीच्या काड्या घेऊन त्यांची जुडी करावी, व ती कोसले चोचविण्याच्या उपयोगांत आणावी. कित्येक लोक एक वीतभर भरीव बांबूचा तुकडा घेऊन तो एका बाजूस चित्रवितात, व त्या कुंचल्यासारख्या झालेल्या तुकड्याच्या भागानें कोसल्यांस चोचविण्याचें काम करितात. असें करणेही कांहीं वाईट नाहीं. एखादे वेळीं असली तयार केलेली कुंचली हरवल्यास ह्मणजे त्यावांचून अतें, असें नाहीं. त्याकरतां कसल्याही दहा वीस काड्या घेऊन त्यांची • जुडी करावी, व कोसले चोचवण्याचे कामास घ्यावी. तसेंच वारंवार थंड पाणी सहज घेतां यावें, ह्मणून रेशीम उकलणारानें आपल्या उजव्या हातास एक थंड पाण्यानें भरलेलें घमेलें घ्यावें. कित्येक लोक घमेल्याचे ऐवजी तसराळे- वजा मातीच्या थारळ्याचा उपयोग करतात. तेंही कांहीं वाईट नाहीं. .