पान:तुतीपासून रेशीम.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४९ ठोकळे बंगालचे सेरिकल्चरचे सुपरिंटेंडेंट यांस लिहिलें असतां त्यांजकडूनही सहज मिळू शकतील. तसेंच आमचे- कडेही मागविल्यास आह्मी पाठवू शकूं. कटो वगैरे किरकोळ साहित्य. रेशीम उकलावयास बसलें, ह्मणजे वारंवार गार पाणी लागत असतें. तें घेण्यास वाट्यांचा उपयोग करतात. कढईतील कोसले उकळतांना पाणी उकळत असतें. कोस- ल्यांतून सलंग एकसारख्या तारा सुदूं लागेपर्यंत कढयां- तील पाणी उकळण्याच्या स्थितींतच राहू द्यावें, व नंतर त्या पाण्यांत थंड पाणी मिसळून त्याची उष्णता जरा कमी करावी. ह्मणजे, तें साधारण कढत अंघोळीच्या पाण्या इतक्या उष्णतेचे ठेवावें. कोसले एकसारखे आधणाच्या स्थितीत ठेवल्याने त्या कोसल्यांच्या तारांची बळकटी कमी होते. ह्मणून एकदां कोसल्यांतून तारा सुटूं लागल्या, ह्मणजे शेजा- रचे पाण्याच्या घमेल्यांतून वाक्यांनी थंड पाणी घेऊन तें "त्या कढईंतील आधणाच्या पाण्यांत मिसळून त्या पाण्याची उष्णता कमी करावी. ज्या वेळीं वेस्ट सिल्क ह्मणजे गुंतवळ्याच्या रेशमाच्या लड्या साफ करावयाच्या असतात, त्या वेळीं त्या गुंतावळ्याचे रेशमास वारंवार आधणाच्या पाण्यांत डुबक्या देऊन तें साफ करावयाचें असतें. त्या वेळीं तें साफ करतांना वारंवार त्यावर गार पाणी ओतावें लागतें. त्या वेळीही वा-