पान:तुतीपासून रेशीम.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४६ रेशमाची तार सर्व सारखी होण्याकरितां ते तारडोळ्यांच्या ठोकळ्याचा उपयोग करतात. अवश्यक असलेल्या जाडीच्या मानाने कोसल्यांचे कमी अधिक तंतु एकवट करून ती तार तारडोळ्यांतून ओवून नंतर रहाटावर गुंडाळण्याकरितां घेतलेली असते. लोखंडी पट्टीच्या छिद्रांच्या ऐवजीं तार- डोळ्यांचा उपयोग केल्यास त्या छिद्रांतून एकसारखी तार घांसत गेल्यानें वारंवार छिदें खराब होत नाहींत. पट्टीचें छिद्र पहिल्यानें गोल असतें, तें घांसत गेल्यानें त्यास आडवे तिडवे कच पडतात. व अशा कचांच्या छिद्रांतून तारा निघतांना अडकून तुटतात. ह्मणून पट्टीच्या छिद्रांऐवजी तारडोळ्यांचाच उपयोग करणें चांगलें. तारडोळ्यांस इंग्र- जी ( Porcelain eyes ) असें ह्मणतात. तारडोळे स्फटिकवर्णी कांचेचे केलेले असतात. त्यांचा आकार पावली- सारखा गोल व तसराळ्या सारखा खोलगट असतो. त्यांचा मला पापोद्रा अति पातळ असतो. व त्या पातळ भागांत अति सूक्ष्म छिद्र असतें. त्यांतून तंतूची एकवट तार ओवून घेऊन रहाटावर गुंडाळली जात असतां बरीच एकजीव -- व सर्व सारखी साफ होते. मैसूरकडे सहा छिद्रांची लोखंडी पट्टी रेशमाची तार सर्व सारखी साफ व एकजीव होण्याकरतां उपयोगांत आणतात. व त्या सहाही छिद्रांतून एक मनुष्य सहा सात तारा एकदम उकलण्यास सुरुवात करतो. सहा तारा एकदम उकलणारा माणूस अति सराव - लेला असावा लागतो. सरावलेला माणूस रोज तीस ते