पान:तुतीपासून रेशीम.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४७ चाळीस तोळे रेशीम उकलूं शकतो. पण तें रेशीम हलक्या दराचें असतें. असल्या रेशमाची तार सर्व सारखी साफ नसते, व त्यांत ठिकठिकाणीं कांडके पडलेले असतात, व त्यांत फुलक्याही पुष्कळ असतात. फुलकी ह्मणजे एकाच ठिकाणीं गुंतागुतीचे रेशमाचाच तारेवर कचन्यासारखा जो भाग असतो, त्यास फुलकी ह्मणतात. असल्या फुलक्या तारेवर ठिकठिकाणी असल्यास, ह्मणजे लडींत असल्या फुलक्या ठिकठिकाणी नजरेस आल्यास, रेशमाची किंमत उतरते. सहा तारांचें रेशीम उकलणारास एकसारखें सहा तारांवर रेशीम उकलतांना लक्ष ठेवावे लागल्याने असले हलक्या दराचें रेशीम निवणें साहजिक आहे. यापेक्षां तिकडील मंडळी सहाचे ऐवजी दोन तारांचें रेशीम उकलूं लागल्यास त्यांचे हातून बरेंच चांगलें रेशीम निघू शकेल. बंगालमध्ये दोन तार डोळ्यांच्या ठोकळ्यांचा रेशीम उकल- णारे उपयोग करितात. तिकडील रेशीम उकलणारे रोज वीस ते पंचवीस तोळे रेशीम उकलतात. पण तें रेशीम चांगलें . असतें. व बाजारांत त्यास भावही चांगला येतो. ह्मणजे मैसूरकडील रेशमापेक्षां असल्या रेशमास शेरीं चार रुपये तरी अधिक किंमत येते. बंगाली तऱ्हेच्या तार ठोकळ्यांत दोन तारा निघण्याची सोय केलेली असते. पण नवीन रेशीम उकलण्यास शिक- णाऱ्या इसमाची दोन तारा काढतांना देखील धांदल होते. कोणी जर असें ह्मणेल कीं, प्रथम एक तार आस्ते आस्ते