पान:तुतीपासून रेशीम.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४५ एका भट्टींत दोन कढया बसवितात, व त्यांचा वर निर्दिष्ट केलेल्या कामाकडे निरनिराळा उपयोग करितात. कित्येक मंडळी पहिल्याने कोसले उकळण्याकरतां डाहळ्यांसकट का - पून आणलेला पाला किड्यांनी खाल्यावर त्यापैकीं राहिलेल्या शिरात्र्यांचा सरपणाचे ऐवजी उपयोग करतात. असें कर- ण्याने देखील सरपणाच्या खर्चाचें मान कमी करतां येतें. तारडोळ्यांचा ठोकळा. कोसल्यांपासून सलंग तार काढून कच्चें विकारीच्या जोगें रेशीम तयार करण्यास लागणाऱ्या साधनांपैकी तार- डोळ्यांचा ठोकळा हैं एक साधन आहे. हैं अवजार नस- ल्यास तार एकजीव होऊन सर्व सारखी होण्यास अडचण पडते. तारडोळ्यांतून तार ओवून घेतल्यास ती तार एकजीव होऊन सर्व सारखी होते. निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळ्या तऱ्हेच्या तारडोळ्यांच्या ठोकळ्यांचा उपयोग करतात. बंगाली तऱ्हेच्या तारडोळ्यांच्या ठोकळ्यांत दोन तारडोळे बसविलेले असतात. म्हैसूर प्रांताकडे तारडो- ळ्यांच्या ऐवजी सहा छिद्रांच्या लोखंडी पट्टीचा उपयोग करितात. जपान वगैरेकडे एका तारडोळ्याचा एक एक ठोकळा उपयोगांत आणतात. आपणास बाजारांत जें कच्चे रेशीम आढळतें, तें प्रायः बंगाल व म्हैसूर या प्रांतां- कडील असतें. मैसूरकडील रेशमापेक्षां बंगालचे रेशमाची तार अधिक चांगली असते. याचें कारण असें आहे कीं, १३