पान:तुतीपासून रेशीम.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० . उत्तरदक्षिण वहात असेल तर दक्षिणेकडील, व दक्षिणो- उत्तर वहात असेल तर उत्तरेकडील खिडकी उघडी ठेवावी. ज्या घरास गवाक्षद्वारे असतील, त्या घरास हवेच्या स्वच्छते- करतांच खिडकी उघडी ठेवण्याची जरूर नाहीं. ज्या वेळेस ..बाहेरील हवा थंड असून घरांत उष्णता जास्त असेल, व थंड हवा आंत घेऊन घरांतील उष्णता माफक करावयाची असेल, तेव्हांच खिडकी उघडी ठेवावी. परंतु ती देखील वर सांगितल्याप्रमाणें विरुद्ध दिशेची मात्र उघडी ठेवावी. ज्या गांवांत किडे पाळण्याचें काम बऱ्याच ठिकाणीं होत असेल, त्या ठिकाणीं समोरून घरांत कधींही वारा येऊ देऊ नये. नाहींपेक्षां वान्याबरोबर किड्यांच्या रोगाचे जंतु घरांत शिरून त्यापासून किड्यांस अपाय होतो; इतकेंच नव्हे, तर सर्व किडे जाया होतात. किडे पाळणे झाल्यावर किडे पाळण्याचें प्रत्येक घर एक भाग मोरचूद शंभर भाग पाण्यांत घालून तें पाणी घेऊन शेणाने सारवावें, व पिचकारीच्या योगानें सर्व घराच्या भिंती सदरहू मिश्रणाच्या पाण्याने धुवून टाकाव्यात. सर्व धुणे झाल्यावर पावशेर गंधकाची भुकणी करून ती मडक्यांत घालावी, व तें मडकें चुलीवर ठेवावें. कांहीं वेळाने आंतील गंधक वितळून त्याने जातीने पेट घेतल्यावर तें मडकें उचलून सारवून धुवून ठेवलेल्या खोलींत ठेवावें, व सर्व दरवाजे २४ घंटे पावेतों बंद ठेवावे. ह्मणजे आधीं पाळलेल्या व त्या वेळच्या किड्यांच्या योगाने घरां-