पान:तुतीपासून रेशीम.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४४ लागतात. एकदा तारा निघू लागल्या, ह्मणजे साधारण उष्णतेचें पाणी कढईमध्ये असले तरी चालतें. त्या वेळीं पाणी इतकेंच कढत असावें कीं, त्यांत हात घालतां यावा. ह्मणजे तें पाणी विशेष त्रासाशिवाय हताळतां यावें. वारं- वार थोडे थोडे कोसले उकलण्यापेक्षां पहिल्यानें आपण जितक्या कोसल्यांचें त्या दिवशीं रेशीम काढू शकूं, अशी आपणांस खात्री असेल, त्या मानाने पहिल्यानेंच सर्व कोसले कढवून घ्यावे, व नंतर त्यांतून थोडे थोडे घेऊन त्यांचें रेशीम काढावें. असें केल्यानें कढईतील पाणी एकसारखें उकळण्याच्या स्थितींत ठेवावें लागत नाहीं. व त्यानें बऱ्याच थोड्या सरपणानें काम भागतें. दुसरें असें केल्यानें रेशीम उकलणारास अतिशय कढणाऱ्या पाण्यांत एकसारखें काम करावें लागत नाहीं. कित्येक ठिकाणी दोन भव्या केलेल्या असतात. पैकीं एका भट्टीवर मोठी कढई असते, व एकीवर लहान कढई असते. पहि- ल्यानें कोसले अंदाजाप्रमाणें एकदम घेऊन ते सर्व मोठ्या कढईंत उकळतात. व त्याच्या तारांची शेवटें सोडवून ते तसेच त्या कढईत ठेवून त्या कढईचे खालील विस्तव काढून टाकतात. व नंतर दुसऱ्या कढईंत मध्यम उष्णतेचें पाणी एकसारखे राहील, अशी त्या कढईखालीं आंच ठेव- तात. व त्यांत पहिल्या कढईतील थोडे थोडे कोसले घेऊन रेशीम उकलतात. अशा कामासाठीं असें केल्यानें थोडें सरपण पुरतें. कित्येक निरनिराळ्या भव्या करण्या ऐवजीं