पान:तुतीपासून रेशीम.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४३ सरपण. परंतु बॉयलरचे जेथें मोठ्या प्रमाणांत रेशीम उकलण्याचें काम चालतें, तेथें कच्चें रेशीम तयार करण्यास लागणारे पाणी ताप- विण्याकरतां सरपणाचा खर्च अवांतर ठिकाणांपेक्षां कमी येतो. बॉयलरचे साहाय्याने नळ्यांचे द्वारा वाफ सोडून निरनिराळ्या कढयांचें पाणी तापविण्यास फार तर प्रत्येक कढईमार्गे रोज एक आणा खर्च येतो. साहाय्यानें पाणी तापविण्याचें काम, जेथें निदान पन्नास तरी कढयांचें पाणी तापविणें असेल, तेथें करावें. जेथें एकच इसमास रेशीम उकलावयाचे असेल, तेथें रेशीम उकला- वयाचे कढईतील पाणी तापविण्याकरतां ती कढई बस- विलेल्या भट्टींत एकसारखें सरपण जाळावें लागतें. अशा ठिकाणी सरपणाचा खर्च मोठा पडतो. प्रायः सरपणा- करतां लोक लांकडांचा उपयोग करीत असतात. त्या ऐवजी जेथें दगडी कोळसा सहज मिळण्यासारखा असेल, तेथें त्याचाच उपयोग करावा, हें चांगलें. दगडी कोळसा एकदा पेटविला व त्याचे चांगले रसरसीत निखारे झाले, ह्मणजे त्याची आच एकसारखी बराच वेळ टिकते. लांक- डांनी तशी एकसारखी आंच ठेवण्यास भट्टीखाली सारखीं लांकडें जाळावी लागतात. आणि ह्मणूनच लांकडांचा अवांतर सरपणापेक्षां अधिक खर्च येतो, असें अनुभवानें ठरलें आहे. तार सुटूं लागे पावेतों कोसले सारखे उकळावे