पान:तुतीपासून रेशीम.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ बरोबर फिरेल, अशी बसवावी. रहाटाच्या कण्यांत एक दांताचें चाक बसवून ज्यावर लांकडाची पट्टी बसवावयाची, त्या ठोकळ्यास एक दांताचें चाक बसवावे. व पहिलें चाक 1. फिरल्याबरोबर पट्टीचें चाक फिरावें, ह्मणून त्या दातयत दातऱ्या बरोबर बसतील, अशीं चाकेँ एका लांकडी रुळांत बसवून टाकावीत. ह्मणजे रहाट फिरूं लागतांच रहाटाचे - दातन्यांचे चाकास गति मिळेल. दातऱ्यांचे चाकानें दांडीस व दांडीनें अंगठ्याचे पट्टीस गति मिळून जसजसा रहाट कमी अधिक वेगानें फिरेल, तसतशी ती पट्टी आपोआप मागें पुढें होईल. व पट्टी मागें पुढें झाल्यानें पट्टीला जोडलेल्या तारांस गति मिळून ती रेशमाची तार अडवी तिडवी निरनिराळ्या कक्षेच्या रेषेवर आपोआप गुंडाळत जाईल. कित्येक ठिकाणीं दातन्यांच्या चाका ऐवजी दोरीचा अथवा चामड्याच्या पट्टीचा उपयोग करितात. रहाटाचे कण्यास चाका ऐवजी ठोकळा बसवून त्यास व पट्टी अडकविलेल्या ठोकळ्यांस खांच पाडून त्या दोहोंस दोरीचें वेटाळें घाल- तात. अशा रीतीनें व्यवस्था केल्यास रहाटाचे योगानें दोरीस व दोरीनें पट्टीस गति मिळते. प्रत्येक चाकाच्या दात कमी अधिक प्रमाणांत असाव्यात. नाहीं तर एकाच कक्षेत आडवी तार रहाटावर गुंडाळली जाईल. त्याचप्रमाणें ठोकळेही लहान मोठे असावेत. अखेरीस दिलेलेल्या चित्रांत काम कसें चाललें आहे, आणि रहाट व भट्टी कशी असावी, याची चित्रे दिली आहेत.