पान:तुतीपासून रेशीम.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४१ त्या तसल्या लड्या फिरून उलगडतांना भराव्यानें सार उलगडली जावी, ह्मणून रहाटावर तार गुंडाळतांना ती निरनिराळ्या कक्षेत गुंडाळली जाईल, अशी त्यांत सोय केलेली असावी. अशी सोय करण्याकरता रहाट फिरतांना रहाटाचे गतीनें निरनिराळ्या प्रमाणांत मागें पुढें सरकत राहील, अशी पट्टी रहाटास जोडावी. व त्या पट्टीस दोन अंगठ्या बसवून त्यांतून तार ओवून घेऊन नंतर रहाटा- वर गुंडाळण्याकरितां ध्यावी. ह्मणजे जसजशी तार गुंडा- ळली जाईल, तसतशी ती पट्टी मागें पुढे सरकत गेल्यानें ती तर आपोआप निरनिराळ्या कक्षेत गुंडाळली जाते. रहाट फिरत असतांना ती अंगठ्याची पट्टी सारखी फिरत रहावी, ह्मणून तिढ्याच्या दोरीचा अथवा दातऱ्याच्या चाकांचा उपयोग करावा. रेशीम उकललें जात असतां ह्मणजे कोस- ल्यांपासून तार निघून रहाटावर गुंडाळली जात असतां ती ओली असल्याने व कोसल्यांचा नैसर्गिक चिकट पदार्थ त्यास लागलेला असल्यानें तार एकावर एक सर्व सारखी गुंडाळली गेल्यास न वाळतां एकास एक चिकटली जाते. पण ती तार निरनिराळ्या कक्षेत बसेल, ह्मणजे रहाटाच्या निरनिराळ्या कक्षेत समांतर अंतरांत गुंडाळली जाईल, तर प्रत्येक तारेचा वेढा अलग असल्यानें ती एकास एक चिकटली जाणार नाहीं. व असल्या लड्यांपासून पुन्हां तार सोडवितांना गुंता होत नाहीं. ह्मणून रहाटासच वळ्यांची पट्टी मागें पुढें फिरेल, ह्मणजे रहाट फिरविल्या-