पान:तुतीपासून रेशीम.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४० न येतां बाहेर निथळून जावें, अशी उतरती बांधण घमेलें बसवितांना करावी. ओट्यावर माणूस बसल्यास त्याचे दुसरे बाजूस ह्मणजे पुढें तारकांचेचा ठोकळा बसेल इतकी जागा असावी. घमेलें मातीचें किंवा तांब्याचें कल्हई केलेले असावें. लोखंडाचें असल्यास तें गंजून लवकर निरुपयोगी होतें. व पुन्हां नवें बसविण्यास भट्टीची बांधण उकलावी लागते. दगडी कोळशाच्या सरपणावर भट्टीचा उपयोग करावयाचा असेल, तर त्यास भट्टी बांधतांना जमिनीपासून आठ बोटांचे अंतरावर भट्टींत सळ्या अथवा पाठ्या कापलेला पत्रा कोळसे त्यांतून न गळतील असा बसवावा. अवांतर सर्व व्यवस्था वर सांगितल्याप्रमाणें करावी. रहाट. विहिरींतून पाणी काढण्याकरितां ज्या जातीचा रहाट उपयोगांत घेतात, तसलाच पण विन पायंड्यांचा, ह्मणजे बिन बाहुल्याचा रहाट रेशीम उकळून त्याच्या लड्या करा- वयाचे काम घेतात. रेशमाच्या लडीचा चत्रगा ज्या मानानें करावयाचा असेल, त्या मानानें रहाटाचा व्यास कमी अधिक ठेवावा. रेशीम ज्या चार लांकडांवर उकल्लें जातें, तीं कोरदार असावीत व कोर जितकी गुळगुळीत करणें शक्य असेल, तितकी गुळगुळीत करावी. रहाटावर गुंडाळली जाणारी तार एकावर एक गुंडाळली जाऊं नये, व ती एकास एक सर्व बाजूनें चिकटली जाऊं नये, व