पान:तुतीपासून रेशीम.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३९ भट्टी. भट्टी झणजे चुलाणे. कोसले उकलून त्यांची तार काढ- ण्यास भट्टीची अवश्यकता आहे. एक हातभर उंचीची चुन्याविटांची पोकळ चुलाण्यासारखी बांधण करावी. व ती ओव्या सारखी करावी. व त्यावर दीड फूट व्यासाचें घमेलें. बसवावें. तें असें कीं, भट्टींत सरपण पेटविल्यास त्याची आंच घमेल्याचे झणजे कढईचे तळास लागून घमेल्यांतील पाणी सहज उकळू शकेल. आंतील उष्णता किंवा उष्णतेची हाय घमेल्याचे वर कडेवर चहूं बाजूनें पदार्थ ठेवल्यास लागूं नये, अशा रीतीनें लिंपलेलें असावें. चूलाण्याचें अथवा भट्टीचें दार बंद केल्यावर आंतील धूर अथवा हाय बाहेर यऊ नये, अशी व्यवस्था असावी. ह्मणजे इंजिनाच्या भट्टीच्या दारासारखें दार घट्ट बसलें जावें. भट्टींतील धूर जाण्याक- रितां धुराडें ठेवावें. तें धुराडें सहाफूट उंचीचें असावें. आंतील धूर निदान पांच फुटाचे उंचीवर सोडला जाईल, असें बांधावें. चुलीस पाठीमागें ज्याप्रमाणें ओटा असतो, त्याप्रमाणे यासही माणूस बसण्या इतका ओटा असावा. ओटा व घमेल्याची कड सारख्या उंचीवर असावीं. ह्मणजे माणूस बसल्यावर घमेल्यांतील पाण्याशीं त्यास सहज खेळता येईल, अशा रीतीनें त्याची उंची समान असावी. भट्टीचा चौक व बसण्याचा ओटा यांजमध्ये दोन बोटांचें उंचीचा ओटा असावा. घमेल्यांत जास्ती पाणी घातल्यावर सहज बाजूला बसण्याचे आव्यावर