पान:तुतीपासून रेशीम.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ देत जावी. उकलण्याकरितां जे कोसले सांठवावयाचे, ते जेथें दमट हवा असेल तेथें सांठवावे. कोसल्यांस दमट हवा लाग- ल्यास कोसले ओलसर रहातात. कोसले तयार करतांना किडे तोंडांतून तंतु काढतात, त्यांच्या तोंडांतील लागलेला ओलसर रस कडक न वाळल्यानें तार एकमेकांस पक्की न चिकटतां कोसला फुललेला रहातो, व तसे कोसले उमल- विल्यावर रेशीम चांगलें निघू शकते. कोसल्यांस वाफ दे- ण्याचे आणखी एक असें कारण आहे कीं, त्यानें वाफ कोसल्यांत शिरून कोसल्यांत असणाऱ्या चिकट पदार्थाश ती संलग्न होते, व कोसले थंड होतांना त्यांतून ज्या वेळीं वाफ नाहींशी होत असते, त्या वेळीं आपल्याबरोबर बाष्प- रूपानें त्यांतील चिकटाही ती नाहींसा करिते. असा चिकटा नाहींसा झाल्यानें कोसले झपाट्यानें उकलले जातात. ह्मणजे त्या कोसल्यांतून चिकटा नाहींसा झाल्यानें रेशीम कोसल्या- पासून उकलतांना भराभर उकललें जातें. वाफविण्या- करितां ज्या टोकय करावयाच्या, त्या रोवळ्यांसारख्या जाळीदार असाव्यात. ह्मणजे त्यांत ठेवलेल्या पदार्थांस सर्व बाजूनें सारखी हवा अथवा वाफ लागली जावी. प्रत्येक टोकरीस पाय असावेत. पाय असल्याने भट्टींत ठेवलेल्या टोकरीचा निकट संबंध आंतील भागांशी येत नाहीं. असल्या भट्टीचा उपयोग कारबन बायसल्फाईडचा भपकारा कोसल्यांस देऊन त्यांतील घुल्यांची रूपांतर होण्याची शक्ति नाहींशी करण्यासही चांगला होतो.