पान:तुतीपासून रेशीम.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३७ अशी असावी कीं, त्यांतील अधिक झालेलें पाणी सहज निघून जावें. नंतर आपणास जितके कोसले त्या दिवशीं रेशीम उकलण्याकरितां पाहिजे असतील, तितके वाफविण्याकरतां अलग काढावे. एकदम सर्व कोसल्यांस वाफ देण्याच्या भरीस पडूं नये. कोसले भट्टींत तीस चाळीस मिनिटें राहिल्यावर आंतील कोसल्यांच्या टोकऱ्या काढून घेऊन दुसऱ्या टोकऱ्या ठेवाव्यात. आपलेपाशीं जितके तंतु काढणारे लोक असतील, त्या प्रत्येकास तीन शेर याप्रमाणें कोसले वाफवावेत; ह्मणजे, रोज एक माणूस तीन शेर कोसल्यांचें रेशीम उकलूं शकतो. प्रत्येक शेरीं दोन हजार कोसले धरण्याची चाल आहे. ह्मणजे दोन हजार कोसल्यांचा एक शेर याप्रमाणे आपल्यापाशीं जितकीं माणसें असतील, तितके कोसले वाफवून काढा- वेत. वाफवलेले कोसले प्रसंग किड्यांचे घरांत ठेवल्यास बिलकुल हरकत नाहीं. कारण, भट्टींतील कहर उष्णतेंत ठेवल्यानें त्यांत कदाचित् असलेले रोगाचे जंतु आपोआप मरून जातात. भट्टींतील उष्णता १६० ते १८० फारेन- हाइटवर असावी. वाफ दिल्यानें कोसले फुलतात, व त्याचे • योगानें कोसल्यांची सलंग तार काढावयास सोपें जातें. न फुलवलेले कोसले तंतु काढावयास, ह्मणजे रेशीम उक- लण्यास, घेतल्यास तार साफ होणाऱ्या कांचेंतून जातांना कांचेच्या छिद्रावर गुंता अडकून तार वारंवार तुटते. व कोसल्यांपासून सपाट्यानें तार उकलत नाहीं. जितके कोसले रोज उकलण्यास लागतील, तितक्यांनाच रोज वाफ