पान:तुतीपासून रेशीम.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३६ कोसल्यांस वाफ देण्याची भट्टी. कोसले उकलावयास घ्यावयाचे आर्धी त्यांस वाफ दिल्यास त्यांचें रेशीम उकलण्यास फार सोपें जातें. उक- लण्याचे आधीं कोसल्यांस वाफ देण्याची अत्यंत अवश्य- कता आहे. कोसल्यांस वाफ देण्याकरितां जी भट्टी तयार करावयाची, ती पक्की करावी. असल्या भट्टया प्रायः लहान- सहान कारखान्यांकरितां फारशा कोणी बांधीत नाहींत. जेथें रेशीम उकलण्याचें काम मोठ्या प्रमाणांत चालत असेल, तेथें असल्या भट्टयांची जरूरी लागते. एक हातभर उंचीचा ओटा तयार करून त्यावर रांजण पालथा घातल्याप्रमाणें बांधण करावी. व आंतील पोकळींत कोसल्यांच्या टोकन्या सहज काढतां ठेवतां येतील, अशा तऱ्हेचें त्याला दार करावे. दार बंद केल्यावर त्यांतील हवेचा सहज अवरोध होईल, इतक्या तन्हेनें दार घट्ट बसेल, अशी दाराची रचना असावी. दार लोखंडी पत्र्याचें करावें. दाराच्या आंतील पोकळी अडीच फूट उंचीची व निदान चार फूट व्यासाची तरी असावी. भट्टीची रचना पाव भिसकुठें भाजण्याकरतां ज्याप्रमाणें करतात, त्याप्रमाणें असावी. भट्टींत लांकडें अथवा दगडी कोळसा घालून तो पेट- वून द्यावा, व त्याचे चांगले जळजळित निखारे झाले ह्मणजे सर्व निखारे काढून घ्यावे. व वेळ न घालवितां त्यांत पांच सहा कळशा चोहोंकडून पाणी मारावें. भट्टीची आंतील रचना