पान:तुतीपासून रेशीम.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३५ त्यांनीं झांकून टाकावें. ह्मणजे त्या कारवन बायसल्फाईडचे जे भपकारे निघतील, त्यांनी त्या कोसल्यांवर सारखा परिणाम होईल. टोपलीवर चोहों बाजूनीं सारखे कोसले रचून टोपली झांकल्यावर त्यावर आंतील हवा सहज बाहेर जाणार नाहीं, असा एक कुंडा झांकण घालावा. याप्रमाणें पंधरा वीस मिनिटें भपकारा दिल्यावर तें असिड चांगल्या घट्ट बाट- लींत ओतून घ्यावें. या भपकाऱ्याचें काम चालू असतां त्याच्या जवळ विस्तव केव्हांही नेऊ नये. नाहीं तर एकदम भ- डका उडेल. याचे भपकाऱ्याजवळ दिवा वगैरे नेण्याची जरूरी पडूं नये, ह्मणून भपकारा देण्याचें काम दिवसा उजेडींच करितात. जेथें उकलण्याकरितां कोसले विकत घेतात, तेथें कोसल्यांची खरेदी झाल्याबरोबर त्यांतील दहा पंधरा कोसले फाडून आंतील कोसले जिवंत आहेत कीं काय, तें पहावें; व असल्यास त्यांस ऊन देऊन चांगलें वाळवावें. कोसले कानापाशीं धरतां जर त्यांतून खुरखुर असा आवाज येत असेल, तर त्यांतील घुले रूपांतर पावून कोसल्यांस भोंक • पाडून दुसरे दिवशीं बाहेर येतील, असें समजावें. व अशा समयीं कोसल्यांस कारबन बायसल्फाईडचे साहाय्यानें अथवा भट्टीतील वाफायनें त्यांतील घुल्यांची रूपांतर होण्याची शक्ति नाहींशी केली पाहिजे. छिद्रे पडलेले कोसले दसपट कमी किंमतीनें विकले जातात. ह्मणून त्या तऱ्हेनें नुकसान होऊ नये, अशी खबरदारी घ्यावी.