पान:तुतीपासून रेशीम.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संरक्षण करण्याकरितां किडे ज्या खोलींत ठेविले असतील, त्या खोलीच्या खिडक्यांस जाळीचा पत्ता लावलेला असावा. तारेच्या जाळ्या अथवा जाळीचा पत्रा जो पिठाचे चाळणी- करितां उपयोगांत आणतात, तसले पत्रे अथवा जाळ्यांचा उपयोग चारी बाजूंच्या खिडक्यांस लावावयास करावा; ह्मणजे ज्या बाजूची खिडकी उघडलेली असेल, त्या बाजूनें माझ्या आंत येण्याचा संभव रहाणार नाहीं. किडे पाळाव- याचे चारी बाजूंस खिडक्या ठेवून शक्य तर गवाक्षद्वारें ठेवावीत. पण दार मात्र एकच असावें. किडे ज्या खोलीत ठेवले असतील, त्याच खोलींत किड्यांच्या खालचा कचरा काढणें, पाला बदलणें, वगैरे कामें कोणी कधींही तेथें करूं नयेत. तर हीं कामें माझ्या मारण्याची ह्मणून जी एक निराळी खोली किड्यांच्या खोलीला लागून असते, तींत करावीत. हमेपा किडे पाळण्याच्या खोलींत जाण्याचा रस्ता माझ्या मारण्याच्या खोलींतून असावा. माझ्या मारण्याच्या खोलींतून किडे पाळण्याच्या खोलींत जावयाचें जें दार असतें, तें व माझ्या मारण्याच्या खोलींत बाहेरून जावयाचें दार, हीं दोन्ही काटकोनांत असावीत. ह्मणजे जरी दारे उघडी असली, तरी किड्यांचे खोलींत किडे असतांना वाऱ्यास तेथें सरळ जातां येऊ नये. किडे पाळावयाचें काम सुरू असतांना जी खिडकी उघडी ठेवावयाची असेल, ती वान्याच्या विरुद्ध दिशेची उघडी ठेवावी. पूर्वपश्चिम वारा वहात असेल तर पश्चिमेकडील, पश्चिमपूर्व पहात असेल तर पूर्वेकडील,