पान:तुतीपासून रेशीम.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ रेशीम काढून विकी पावेत सर्व क्रिया घरांतले घरांतच जो कोणी करील, त्यास या धंद्यापासून विपुल फायदा मिळू शकतो. कोसले. चंदरक्यांतून कोसले काढून घेतल्यावर आपणास जितके कोसले बियाकरतां पाहिजे असतील, तितके कोसले ठेवून बाकीच्या कोसल्यांस रोज एक तासप्रमाणे सहा सात दिवस ऊन द्यावें. उन्हांत कोसले वाळविण्यानें कोसल्यां- तील घुल्यांची रूपांतर होण्याची शक्ति नाहींशी होते. नाहीं तर घुले रूपांतर पावतात; ह्मणजे, त्यांची फुलपाखरें होतात. व तीं फुलपाखरें कोसल्यांस छित्रे पाडून त्यांतून बाहेर येतात. भोंक पाडलेल्या कोसल्यांपासून सलंग तार निघत नाहीं. ह्मणजे, त्यांचें पहिल्या प्रतीचें रेशीम कधीही निधूं शकत नाहीं. असल्या छिद्र पडलेल्या कोसल्यांपासून निघालेल्या रेशमास सलंग तारेच्या रेशमापेक्षां कमी भाव येतो. ह्मणून उष्णतेच्या साहाय्यानें कोसल्यांतील किड्यांची उडण्याची शक्ति नाहींशी केली पाहिजे. पावसाळ्यांत ऊन नसेल व सदोदित आकाशांत अभ्रं राहतील, तर कोसल्यांस कारबन बायसल्फाईडचा भपकारा देऊन त्यांच्यांतील घु- ल्यांची रूपांतर होण्याची शक्ति नाहींशी केली पाहिजे. कारवन बायसल्फाईड एका पसरट कांचपात्रांत ओतून त्यावर बुरडी टोपली झांकण ठेवावी, व त्या टोपलीस चोहों बाजूनें कोस-