पान:तुतीपासून रेशीम.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३३ ( २४ ) किडे पाळण्याच्या घरासभोवतालची जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. (२५) किडे पाळण्याचें घर शक्य तितकें आंत बाहेर हवा न जाईल असें असावें. ( २६ ) किड्यांच्या अखेरीचे स्थितींत शक्य तितके किडे मोठ्या झाडाचे पाल्यावर पाळीत जावे. कोसले उकलणें. कोसल्यांपासून सलंग तारा काढण्याचे कामास रेशीम उकलणें असें ह्मणतात. रेशीम उकलण्यास कोसले, कोसल्यांस वाफविण्याची भट्टी, रेशीम उकलण्याची भट्टी, रहाट, सर- पण, तारडोळ्यांचा ठोकळा, घमेलीं, कटोन्या, काड्यांची जुडी, वाट्या वगैरे सामान लागतें. जेथें मोठ्या प्रमाणावर काम करावयाचें असतें, तेथें भट्ट्यांचीं कामें बॉयलरनें वाफ सोडून करतात. जेथें फक्त रेशीम उकलण्याचाच कारखाना असतो, तेथें कोसले विकत घेऊन काम करीत असतात. असल्या कारखान्यांस 'फिचर' अशी संज्ञा आहे. तेथें "अनेक रेशीम उकलणारांची सोय केलेली असते. असल्या कारखान्यांत बॉयलरचा उपयोग करितात. निरनिराळ्या भय्या करण्याच्या ऐवजीं एका बॉयलरचे साहाय्यानें निर- निराळ्या ठिकाणी नळ्यांचे द्वारा कढईतील पाणी वाफेनें तापवितात. व याप्रमाणें अनेक भट्ट्यांचे काम बॉयलरचे. साहाय्यानें साधून घेतात. रेशमाचे किडे पाळून त्यांचें १२