पान:तुतीपासून रेशीम.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ अंड्यांतून फुटल्यावर जसजसे ते वाढत जातील, तसतसा त्यांस जून जून पाला खावयास घालीत जावा. ( १४ ) धूळ उडालेला पाला, पाण्यांत भिजलेला पाला, पाण्यांत बुडलेल्या लागवडीचा पाला, आणि कीड लागलेला, दुरमडलेला, नव्या लागवडीचा, धुमाऱ्याचा व सात्रटीं- तील पाला किड्यांस खावयास घालीत जाऊं नये. (१५) लिदेचें खत लागवडीस कधीही घालूं नये. (१६) सुपलींत रोगानें मेलेला किडा आढळल्यास तो वेचल्याबरोबर त्या जागीं मोरचुताची भुकणी चोळीत जावी. ( १७ ) निरनिराळ्या वयाचे किडे एकाच खोलींत ठेवीत जाऊं नयेत. ( १८ ) एकाच खोलींत जास्ती किडे पाळीत जाऊं नयेत. ( १२ ) एकाच खोलींत जास्ती किडे ठेवीत जाऊं नयेत. तसेंच सुपल्यांत किडे दाट ठेवीत जाऊं नयेत. ( २० ) किडे पाळण्याच्या खोलींत कोसले कवींही ठेवू नयेत. (२१) दोन तीन वेळांनंतर निराळ्या हवेंतील बीं वापरीत जावें. ( २२ ) घरांत घाण ठेवूं नये, ह्मणजे घरांत कुट वास येऊ नये. ( २३ ) घरांतील हवा एकदम थंड अथवा एकदम उष्ण होऊ देऊ नये.