पान:तुतीपासून रेशीम.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३१ नजरेस पडल्यास तो ताबडतोब काढून दूर नेऊन अथवा पुरून टाकीत जावा. (७) सुपल्यांतील सर्व किडे कात टाकावयास लाग- ल्याशिवाय त्यांस पाला घालावयाचें बंद करूं नये व सर्व किड्यांनीं कात काढल्याशिवाय पाला घालावयाचें सुरू करूं नये. (८) लीद अथवा कचरा यावरून जाणारी हवा किड्यांचे घरांत येणार नाहीं, अशा दूर ठिकाणीं लीद अथवा कचरा टाकित जावा. व तो तेथें हमेशा ओला राहील, अशी व्यवस्था करावी. ( ९ ) घरांतील हवा सत्तर आणि ऐशीं या अंशांच्या मधील कोणत्याही अंशावर ( एखाद्या अंशाच्या फरकानें ) कायमची राहील, अशी व्यवस्था करावी. (१०) किड्यांस वेळच्या वेळीं खावयास पाला घालावा. ( ११ ) किड्यांनी पहिल्या दोन काती टाकी पावेतों . चार वेळ व किड्यांचे अखेरीचे स्थितींत तीन वेळ, याप्र- माणें समान अंतराने पाला घालीत जावा. ( १२ ) किड्यांखालील गदळ शक्य असेल तर दर रोज एक वेळ काढीत जावें. (१३) किड्यांस लहान असतांना जून व मोठे झाल्यावर कोवळा पाला घालूं नये, ह्मणजे अगोदर जून व नंतर कोवळा पाला किड्यांस घालीत जाऊं नये. किडे