पान:तुतीपासून रेशीम.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० आपल्या घरव्याच्या डागडुजीकरतां त्या नेत असतात. ह्मणून चंदरक्या उघड्यावर ठेवल्यावर त्यांवर नजर ठेवीत जावें. . ह्मणजे, चिमण्या वगैरे पक्ष्यांकडून नुकसान न होईल, अशी खबरदारी घ्यावी. रोगनिवारक उपाय. ( १ ) किडे पाळावयास सुरू करावयाचें सर्व सामान एक भाग मोरचूत व शंभर भाग पाण्याचें मिश्रण यानें धुऊन काढावें, व सर्व सामान घरांत ठेवून गंधकाची धुरी घरांत करून चौवीस तास घराची दारें व खिडक्या बंद करून ठेवाव्यात. ह्मणजे, घरांत आंत बाहेर हवा जाऊं येऊं देऊं नये. ( २ ) सूक्ष्मदर्शक यंत्रानें तपासलेलें बी वापरावें, ह्मणजे शास्त्रीय बी वापरावें, व सवड नसल्यास व्यापारी बीं वाप- -रीत जावें. (३) किडे पाळावयाचें काम चालत असतां बान्याचा -सरळ प्रवेश घरांत होऊं देऊ नये. ( ४ ) किडे पाळावयाचे खोलींत किड्यांखालचें गदळ काढू नये. ( ५ ) घरांतील केर काढीत असतां धुरळा न उडेल, अशा रीतीनें सावकाश केर काढीत जावा. ( ६ ) अशक्त, रोगट, अथवा भोक पडलेला किडा