पान:तुतीपासून रेशीम.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२९ चालेल. बाहेर अतिशय माशा झाल्यास खिडक्यांचे बाहेरील बाजूस कांचेचें भांडे अथवा चिनी मातीचें पसरट भांडें ठेवून त्याच्या आंत कांठोकांठ पाणी भरावें, व त्यांत त्र दोन थेंब घासलेट तेल टाकावें. खिडकींतून बाहेरील माझ्यांस किड्यांचा वास येऊन खिडकीच्या वाटेनें त्या आंत जाण्याचा प्रयत्न करितात, ह्मणजे ज्या बाजूनें त्यांस बास येत असतो, त्या बाजूस माझ्या जाऊं लागतात. पण जाळीच्या पत्र्यांतून त्यांस आंत जातां येत नाहीं. नजिकच स्वच्छ पाण्याचें भांडें ठेविलें असल्यास ती आंत जाण्याची वाट आहे, असें समजून त्या तिकडे भरारी मारतात व पाण्यांत पड- तात. नुसत्या पाण्यांत माशा पडल्यास त्या बाहेर पोहून निघूं शकतात. पण घासलेट तेलाचा अंश पाण्यावर अस- ल्यानें तो त्यांस लागून तत्काळ त्या मृत्यु पावतात. यत्- किंचित् घासलेट तेलाचा अंश माशा मरण्यास पुरेसा होतो. माशा अथवा डास आपली अंडी जेथें पाणी सांचलें असेल, अशा ठिकाणी अथवा हमेश ओल्या राहणाऱ्या जागेंत -घालतात. थोडें घासलेट मिळवून सडा टाकल्यास व सांच- लेल्या पाण्यांत थोडे घासलेटाचे थेंब टाकल्यास त्यांच्या अंड्यांचा सहज नाश होऊं शकतो. व माशा आणि डास यांचा सुळसुळाट बराच कमती करितां येतो. चिमण्यांपासूनही किड्यांस नुकसान पोचतें. किडे पिकल्यावर त्यांस चंदर- क्यांत ठेवावें लागतें. व त्या चंदरक्या उघड्यावर राहतात. त्या वेळीं चिमण्या किडे उचलून नेतात. तसेंच कोसलेही