पान:तुतीपासून रेशीम.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ घरांत शिरतांना पहिल्याने माझ्या मारण्याचे खोलींत जाऊन तेथे आपल्याबरोबर माशा आल्या आहेत किंवा नाहींत, तें पहिल्याने पहावें, व नंतर किड्यांचे घरांत प्रवेश करावा. बंगाल प्रांतीं माझ्या इतक्या हुपार झाल्या आहेत कीं, माझ्या बाहेरून आंत जाणान्या इसमाचे अंगावर बसून किड्यांचे घरांत गेल्यावर उडून किड्यांवर जातात. अशा समयीं माझ्या मारण्याचे खोलींत प्रवेश केल्यावर आपले अंग देखील झटकून पहात जावें. एखादी माशी असल्यास माझ्या मारण्याचे खोलींतच केरसुणीनें मारून नंतर किडे पाळाव याचे खोलीत प्रवेश करावा. माझ्या मारण्याची खोली ठेंगणी असल्याने माझ्या सहज मारतां येतात. केरसुणीचे ऐवजी चंबरीसारख्या केसांच्या झुपक्यानें माशा मारणें सोपें जातें. कित्येक ठिकाणी किडे पाळावयाचे दारा शेजारी, ह्मणजे तोंडाशीं, औरस चौरस पांच फुटाची माझ्या मारण्याकरितां खोली करितात. पण ही रीत बरी नव्हे. असल्या खोलींत तच्या बदलता येत नाहींत. ह्मणजे, किडे पाळण्याचेच खोलींत किड्यांखालचा कचरा काढावा लागतो. पण हें बरें नव्हे. किड्यांखालचा कचरा माझ्या मारण्याच्या खोलीत काढतां येईल, एवढी खोली केली असल्यास हरकत नाहीं. बाहेर खोली करण्यापासून आंतील जागा किडे पाळण्याचे चौ- खुर ठेवण्यास उपयोगांत घेतां येते, याशिवाय असें करण्या- पासून विशेष फायदा नाहीं. अशा समयीं दोन खोल्या उप- योगांत आणून तिसरी लहान खोली माश्यांकरतां केल्यास