पान:तुतीपासून रेशीम.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२७ ह्मणून चौखुरांचे पायांस टार तेल अथवा विव्याचें तेल थबथबीत लावावें. ह्मणजे हे प्राणी चौखुरावर चढूं शकणार नाहींत. उंदीर चौखुरावर चढू नयेत, ह्मणून जमिनीपासून फुटाचे उंचीवर चौखुराचे पायास पत्रा बसवावा. व पिठांत सोमल मिसळून त्याच्या गोळ्या चौखुराचे पायांपाशीं ठेवीत जाव्या. ह्मणजे कदाचित् उंदीर आले, व चौखुरावर चढूं लागले, तर आधीं त्या गोळ्या खाऊन मरून जातील. कित्येक ठिकाणीं चौखुरांच्या ऐवजीं सांखळ्या लोंबत ठेवून त्यांस आडव्या काड्या बांधून त्यांवर सुपल्या ठेवतात. अशा ठिकाणीं छतापासून एक दोन हातांवर गोल पता त्या सांखळीत बसवून नंतर सांखळी अडकवावी. ह्मणजे सांखळीवरून उतरून जरी उंदीर आले, तरी त्या पत्र्या पावेतों आल्यावर त्या पत्र्यावर त्यांनी पाऊल ठेवतां क्षणींच पत्रा कलंडून उंदीर खालीं पडतील. अत एव अशा रीतीनें उंदरांपासून संरक्षण करितां येतें. माश्यांपासून संरक्षण करण्याकरितां माशा घरांत येऊ देऊ नयेत, यावांचून दुसरा - उपाय नाहीं. माश्या घरांत आल्यावर त्यांपासून किड्यांचें संरक्षण करणें जरा कठिण आहे. एक माशी रोज सहज दानशें किड्यांस मारूं शकते. किड्यांस भोंक पाडून आंतील रस माशी खात असते. किड्यांचे आंतील रस माशी खावो अथवा न खावो, पण त्यांनीं भोक पाडल्यास किडा जिवंत राहू शकत नाहीं. किड्यांस कोणच्याही तऱ्हेनें एकदा भोंक पडलें, ह्मणजे तो किडा जिवंत राहू शकत नाहीं. किड्यांचे